बँकेने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा आहे. तर १० जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
मुख्य तांत्रिक अधिकारी – ०१ जागा
सहायक तांत्रिक अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा कम्प्युटर सायन्स विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए परीक्षा उत्तीर्ण असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण – नांदेड
वयोमर्यादा –
मुख्य तांत्रिक अधिकारी – कमाल ४५ वर्षे
सहायक तांत्रिक अधिकारी – कमाल ४० वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन
अर्ज प्रत्यक्ष पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नांदेड
ऑनलाइन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता – dccbank.nanded@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२४
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.