छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्याने गाय आणि गायीच्या वासराला गोठ्यात बांधले. थंडीमुळे आईच्या कुशीत झोपलेल्या वासरावर गोठ्यात शिरून बिबट्याने हल्ला केला. वासराचा आवाज ऐकून गायीने दावण तोडून बिबट्याशी झुंज दिली. तब्बल दहा मिनिटे झुंज देत गायीने वासराची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आहे. ही थरारक घटना सोयगाव तालुक्यातील जरांडी शिवारामध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. गायीने वासरासह मालकाच्या घरासमोर हंबरडा फोडल्याने ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या जरंडी शिवारात गट क्र. २०० मध्ये विजय जगताप यांचं शेत आहे. दरम्यान, विजय यांनी सायंकाळी चारा टाकून गायीला शेतातील गोठ्यात बांधले. परिसरात असलेल्या बिबट्याला वासराच्या हंबरण्याच्या आवाज आला. आवाजाचा अंदाज घेत पत्रे उचकटून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि वासरावर हल्ला चढविला. बिबट्या वासराच्या नरडीचा घोट घेणार तोच वासराने आवाज केला. जवळच असलेल्या गायीने दावन तोडले. तब्बल दहा मिनिटं बिबट्याशी झुंज देत गायीने बिबट्याला परतावून लावत वासराचे प्राण वाचविले आहे.

आठ दिवसात तीन शेळ्या,एक वासराचा फडशा
आठवडा भरापासून बिबट्याचा जरंडी शिवारात मुक्तपणे संचार सुरू आहे. आठ दिवसात या बिबट्याने तीन शेळ्या आणि एक वासराचा फडशा पाडला आहे. वनविभागाने या बिबट्याला पिंजरे लावून पकडण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनास्थळी वनविभागाच्या पथकांनी पंचनामा केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News