गणपती बाप्पाचा स्वागत सोहळा होऊन प्राणप्रतिष्ठापनेची तयारीही झाली आहे. सुखकर्ता दुखहर्ता म्हणवणाऱ्या या गजाननाला आपण दहा दिवस आपल्याकडेच ठेवणार आहोत आणि यामुळे जीवनात भरपूर सकारात्मकता येणार आहे. आपले विघ्न ही दूर होणार आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. प्रत्येकजण गणपतीची आराधना खूप उत्साहाने करणार आहे. गणपतीला प्रसन्न करणारी काही मंत्र जाणून घेऊया. या मंत्राचे पठनाने तुम्हाला आयुष्यात सर्वकाही सहज मिळू शकते. चला तर जाणून घेऊया ती मंत्र कोणती?
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
एकदंताय विद्महे । वक्रतुंडय धीमा । तन्नो दंति प्रचोदयात् ।
गं क्षिप्रप्रसादनाय नम:
ॐ गं नमः
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अर्थ – वक्र सोंड, विशाल शरीर, करोडो सूर्यासारखे महान प्रतिभा असलेले.
हे प्रभो, माझी सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण कर.
एकदंताय विद्महे । वक्रतुंडय धीमा । तन्नो दंति प्रचोदयात् ।
अर्थ – सर्वव्यापी एकदंत भगवान गणेशाची प्रार्थना करतो. निराकार देवाचे ध्यान करतो आणि बुद्धीसाठी प्रार्थना करतो. मन प्रबुद्ध करण्यासाठी एकदंत गणेशापुढे नतमस्तक होतोय.
गं गणपतये नमः
‘ मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे.
गं क्षिप्रप्रसादनाय नम:
आलस्य, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधनाचा हा मंत्र जपावा.
ॐ गं नमः
विघ्न दूर करून धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावा.
या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतान गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचा पाठ केल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते.