Maharashtra Covid Restrictions: राज्यात गणेशोत्सवावर यंदाही कठोर निर्बंध?; केंद्र सरकारने केली स्पष्ट सूचना

हायलाइट्स:

  • केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र.
  • सण-उत्सवांमधील गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावा.
  • दहीहंडी, गणेशोत्सवाचा उल्लेख करत केली सूचना.

मुंबई:कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचे खास कौतुक केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. याच पत्रात आगामी दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सणांबाबत महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. ( Ganeshotsav Covid Restrictions Updates )

वाचा:राड्यानंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा!; नेमकं काय ठरलं?

महाराष्ट्रात कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत ते कौतुकास्पद आहेत. राज्यात दैनंदिन नवीन करोना बाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरापासून घट पाहायला मिळत असली तरी काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या आणि करोना पॉझिटिव्हिटी दर वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अधिक खबरदारी घ्यावी लागेल, असे नमूद करत आगामी सण आणि उत्सवांबाबत भूषण यांनी राज्याला महत्त्वाची सूचना केली.

वाचा:राज्यात नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा ५ हजारांच्या खाली; अशी आहे ताजी स्थिती

महाराष्ट्रात येत्या काळात दहीहंडी आणि गणेशोत्सव यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या काळात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोविडचा धोका पाहता ही गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यासाठी या सण आणि उत्सवांच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात केली आहे. या सूचनांनुसार राज्याकडून योग्यती पावले उचलण्यात येतील अशी अपेक्षा असल्याचेही सचिवांनी पुढे नमूद केले.

वाचा:कोविड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लाच मागितली आणि…

निर्बंध आणखी कठोर होणार?

सण आणि उत्सवांमध्ये होणारी गर्दी कोविड महामारीत सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे आढळून आलेले आहे. त्याचा दाखला देत भूषण यांनी राज्य सरकारला निर्बंध लावण्याबाबत सूचना केली आहे. महत्त्वाचे म्हणजे केरळमध्ये नुकताच ओणम सण साजरा झाला. त्यानंतर तिथे अचानक कोविड रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राने महाराष्ट्राला सावध केले आहे. या पत्रानंतर राज्यात विशेष करून गणेशोत्सवाबाबत आणखी नियम कठोर केले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने आधीच दहीहंडी उत्सवाला मनाई केलेली आहे.

वाचा:स्वत:च्या वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं?, राणेंनी दिला हा इशारा

Source link

ganeshotsav covid restrictionsmaharashtra covid restrictionsmodi govt on maharashtra covid restrictionsunion health secretary rajesh bhushan newsunion health secretary writes to maharashtraकोविडगणेशोत्सवदहीहंडीमहाराष्ट्रराजेश भूषण
Comments (0)
Add Comment