२५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणून का साजरा केला जातो? जाणून घेऊया कारण आणि इतिहास

Christmas Day : २५ डिसेंबर रोजी जगभरात ‘ख्रिसमस’ म्हणजेच ‘नाताळ’ हा सण साजरा केला जातो. या दिवसाला ‘ईसा ख्रिसमस (ईसा मसीह या नावावरून)’ असेही म्हणतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक तो उत्साहाने साजरा करतात. पण, नाताळ २५ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे जाणून घेऊया.
हा आहे ख्रिसमसचा इतिहास :

बायबलच्या नवीन करारात नोंदवल्याप्रमाणे नाताळचा इतिहास येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला होता आणि म्हणून या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. परंतु, काही इतिहासकार आणि धार्मिक अनुयायांच्या मते या दिवशी येशूचा जन्म झाला नव्हता आणि तो फक्त प्रतीकात्मक वाढदिवस आहे. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी २५ डिसेंबरला Christmas साजरा केला जातो. ईसा मसीह यांचा जन्म मेरी (मरियम) यांच्या घरी झाला. असे मानले जाते की, मेरीला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये तिने प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती.

या दिवशी पहिल्यांदा साजरा केला गेला ख्रिसमस :

ख्रिसमस हा शब्द मास ऑफ क्राइस्ट ((Mass of Christ) वरून आला आहे. ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या कारकिर्दीत ३३६ मध्ये प्रथम साजरा केला गेला. यानंतर पोप ज्युलियस यांनी येशू ख्रिस्ताचा अधिकृत वाढदिवस २५ डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

ही आहेत ख्रिसमस साजरा करण्याची आणखी काही कारणे :
२५ डिसेंबरपासून दिवस मोठे होऊ लागतात, म्हणून हा दिवस सूर्याचा पुनर्जन्म मानला जातो आणि यामुळेच युरोपियन लोक २५ डिसेंबरला उत्तरायणाच्या दिवशी सण साजरा करत असत. ख्रिश्चन समुदायातील लोकांनी देखील हा दिवस प्रभु येशूचा जन्मदिवस म्हणून निवडला आणि त्याला ख्रिसमस असे नाव पडले. पूर्वी इस्टर हा ख्रिश्चन समाजाचा मुख्य सण होता.

Source link

christmas 2023christmas daychristmas eassychristmas information in marathinew year 2024xmasxmas historyxmas information in marathiख्रिसमसनाताळ निबंध
Comments (0)
Add Comment