वीजबिल थकल्याने कारवाई, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविकेसह पतीची मारहाण

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: दोन महिन्यांचे सहा हजार रुपये वीजबिल थकल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याना भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व तिचे पती कैलास पावशे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे कुटुंबासह राहतात. त्यांच्या सासऱ्याच्या नावावर असलेल्या घराचे सहा हजार रुपयांचे वीजबिल थकले होते. दोन महिन्यांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिल भरण्यासाठी वारंवार सूचना दिली, मात्र थकीत बिलाचा भरणा न केल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास महावितरणचे पथक पावशे यांच्या घरी वीजमीटरवर कारवाई करण्यासाठी पोहोचले. मात्र हेमलता पावशे यांनी महावितरणच्या पथकातील महिला कर्मचारी पल्लवी टोळे, प्रियस्वी पडवळ यांना शिविगाळ करत बेदम मारहाण केली.

संतापजनक! कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार, पुणे हादरलं
हेमलता पावशे यांचे पती कैलास पावशेही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, त्यांच्या जवळील मोबाइल हिसकावून घेतले . घडलेल्या घटनेबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली. कोळसेवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पारधी कुटुंबातील महिलेला विवस्त्र करून मारहाण; भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Source link

bjp ex corporator hemlata pavasecrime newsKalyan newsThane CrimeThane newsकल्याण न्यूजठाणे न्यूजभाजपमहावितरण कर्मचाऱ्यांना मारहाणहेमलता पावसे
Comments (0)
Add Comment