राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडा नंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात वाद रंगू लागला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यापुढे अजित पवार गटात गेलेले सर्व नेते हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असे विधान केल्यानंतर याला आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना एकेरी शब्दांचा उल्लेख करत यालाच सर्व काही कळतं का असे म्हणत जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही ते एकाकी पडल्यामुळे ते भरमिष्ट झाले आहेत असे मुश्रीफ म्हणाले आहेत.ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन जेव्हा गुवाहटीला गेले आणि आमची सत्ता जेव्हा जाणार जेव्हा लक्षात आले त्याच वेळी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जाऊ यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी सह्या घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यामध्ये जितेंद्र आव्हाड याची सही एक नंबरला होती. नंतर अजित पवार यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यामध्ये आम्ही केवळ पाच ते सहा जण होतो. त्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड नव्हतेच ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. या पूर्वी भाजप सोबत जाण्यासाठी वरिष्ठांनी अनेक वेळा निर्णय घेतला मात्र ते शक्य झाले नाही. मात्र आता अजितदादांना एकाकी पडू द्यायचे नव्हते. त्यामुळे आम्ही मनापासून अजित दादांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि मंत्री मंडळात सामील झालो. परवा ते म्हणाले की सर्वजण कमळावरती लढतील आरएसएस ची बैठक झाली आहे. सगळं काही यालाच कळतं का? ते त्यांच्या पक्षात एकाकी पडले आहेत त्यांना कोणी विचारत नाही. यामुळे ते सध्या भरमिष्ट अवस्थेत असल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News