बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024: तुम्ही बीएससी/ डीएमएलटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई महापालिकेत एक उत्तम संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती द्वारे विक्रोळी येथील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फूले रुग्णालयात ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदाची भरती सुरू आहे.

पालिकेने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ESIS Hospital Recruitment 2024: नवी मुंबईच्या ‘ईएसआयएस’ रुग्णालयात भरती; पगारही आहे भरपूर

‘मुंबई महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवीधर म्हणजेच बीएससी उत्तीर्ण असावा. तसेच त्याने डीएमएलटी (DMLT) किंवा एमएसबीईटी (MSBET) कोर्स केलेला असावा. किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि त्यानंतर पॅरामेडीकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. तसेच महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२४

अर्ज करण्याचा पत्ता – उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या आस्थापनेत कार्यालयीन वेळेत भेट द्यावी.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन तसेच पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. अर्ज रुग्णालयातच कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

BMC Bharti 2024BMC Recruitment 2024Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Jobsrecruitmentबृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३मुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका २०२४
Comments (0)
Add Comment