‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली. ‘जीआयसी’ म्हणजेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विभागातील ‘सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I) पदाच्या एकूण ९६ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून १२ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I)
विभाग आणि पदसंख्या:
हिन्दी – ०१ जागा
जनरल – १६ जागा
सांख्यिकी – ०६ जागा
अर्थशस्त्र – ०२ जागा
लिगल – ०७ जागा
एचआर – ०६ जागा
इंजिनियरिंग – ११ जागा
आयटी – ०९ जागा
अकचुरी – ०४ जागा
इन्शोरन्स – १७ जागा
मेडिकल – ०२ जागा
हायड्रोलॉजीस्ट – ०१ जागा
भूभौतिकशास्त्रज्ञ – ०१ जागा
अग्रीकल्चर सायन्स – ०१ जागा
नॉटिकल सायन्स – ०१ जागा
रिक्त पद संख्या – ८५ जागा
बॅकलॉग भरतीतील पदे – ११ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ९६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. पदनिहाय विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वयोमर्यादा -किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

General Insurance Corporation of India JobsGIC Bharti 2023GIC recruitment 2023GIC Recruitment 2024recruitmentजनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment