सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा, ट्रॅफिक जामचा फटका, चार किलोमीटरच्या रांगा

रायगड : दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्टीमध्ये अलिबागला पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अलिबागकडे येणारे रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी व्यापले असून वडखळ अलिबाग रस्त्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर ज्यांची ट्रॅफिक जाम मधून सुटका झाली त्यांनी समुद्रकिनारे गाठल्याने अलिबागसह परिसरातील समुद्र किनारे असून समुद्रकिनारीही पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

चौथा शनिवार रविवार तसेच नाताळची लागून आलेली सुट्टीची मजा लुटण्यासाठी तर काहीजण नवीन वर्षाच्या स्वागताला अलिबाग मुक्कामी येत असतात. यामुळे अलिबाग व परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेज, शासकीय तसेच पर्यटन महामंडळाचे विश्रामगृहे व काही ठिकाणचे खाजगी बंगले फुल्ल झाले आहेत. अलिबागमध्ये हॉटेल्स फुल्ल झाले असल्याने राहण्यासाठी काही पर्यटक मुरुड, श्रीवर्धन तसेच दिवेआगर पर्याय शोधत आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अलिबाग जवळ वरसोली व किहीम येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत.
तुम्ही धंदा करायला बसलाय का? निधीचे वाटप न झाल्याने भुसेंची नाराजी, पीकविमा कंपन्यांना डोस
मुंबईहून जलमार्गाने येणाऱ्या पर्यटकाचा अलिबाग प्रवास काहीसा सुखाचा असू शकतो. मात्र रस्ता मार्गाने येणाऱ्या पर्यटकाला अलिबागला पोहोचणे जिकरीचे होऊन बसले आहे. वडखळ पासून अलिबाग पर्यंत वाहनांची सुमारे चार किलोमीटर लांबच लांब रांगा सकाळी लागल्या असून यामध्ये अजून वाढ होणार आहे. अरुंद रस्ते, मार्गावरील अवजड वाहतूक आणि वाहनांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत असतानाचे चित्र आहे. मात्र वाहतुकीच्या खोलंब्यामुळे येणारे पर्यटक चांगलेच वैतागलेले दिसत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य, प्रताप चिखलीकरांचा दावा; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा
गोवा महामार्गाचे पनवेलकडील मार्गिकेचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी देखील वाहतूक ठप्प झाली असून पर्यटक अडकून पडला आहे. दरवर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून यावर्षी कोकणात सुमारे तीन लाख पर्यटक येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अलिबागसह कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या कालावधीत गणपतीप्रमाणे अवजड वाहनावर बंदी करावी अशी मागणी होत आहे.
प्रशांत किशोर यांचं काँग्रेसच्या विचारधारेबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले आता त्यांना निर्णय घ्यायचाय…

वाळू वाहतुकीसाठी अव्वाच्या सव्वा खर्च, वाहनधारक – नागरिक आमनेसामने

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Alibag Traffic Jamalibag vadkhal roadmarathi newsraigad newsअलिबाग बातम्याअलिबागमध्ये ट्रॅफिक जामअलिबागमध्ये वाहतूक कोंडीरायगड बातम्यासुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये ट्राफिक जाम
Comments (0)
Add Comment