१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीअंतर्गत भरती

UPSC NDA Recruitment 2024 : तुम्ही १२ वी पास असाल आणि नोकरीच्या शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण नोकरीच्या शोधात असणार्‍या उमेदवारांना थेट सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अ‍ॅकॅडमी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२४ ठरवण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमी
पद संख्या : ४०० जागा

पदनिहाय जागांचा तपशील :

नॅशनल डिफेन्स अकादमी,
लष्कर (Army) : २०८ जागा
नौदल (Navy) : ४२ जागा
हवाई दल (Air Force) : १२० जागा
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] : ३० जागा

CDS Exam : एनडीए शिवाय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार; सीडीएस हा देशसेवेत दाखल होण्याचा दुसरा पर्याय
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ जानेवारी २०२४
परीक्षेची तारीख : २१ एप्रिल २०२४
परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) २०२४
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीमधील या भरतीसाठी आणि परीक्षेकरता पात्र होण्यासाठी उमेदवार Physics, Chemistry and Mathamatics या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमी भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जुलै २००५ ते १ जुलै २००८ या दरम्यान झालेला असावा.

अर्ज आणि परीक्षा शुल्काविषयी :

सदर भरती अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारांना खालीलप्रमाणे अर्ज आणि परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

जनरल / ओबीसी : १०० रुपये
SC / ST / महिला उमेदवार : अर्ज शुल्क नाही.
काही महत्वाच्या लिंक्स :

Union Public Service Commission च्या राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Union Public Service Commission च्या राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीच्या भरतीअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Government jobnational defense and naval academynavy recruitmentpan indiaupsc nda recruitment 2024work in armyराष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीसरकारी नोकरीसैनिक भरती
Comments (0)
Add Comment