खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी; १५-१५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहने सोडणार, वाहतूक पोलिसांचा निर्णय

लोणावळा: पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा सुरू, अनेकांना ट्रॅफिक जामचा फटका, तब्बल चार किलोमीटरच्या रांगा
वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी आता पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक १५-१५ मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे. नाताळ सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होते. त्यामुळे आज शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत जड वाहनांना माहमार्गावर बंद घालण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे वाहतूक अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिली आहे.

नाताळनिमित्त शाळा व महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते. वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने आणि कार हे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते.

मोदींच्या प्रचारासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना का उतरवता? शेतकऱ्यांकडून विकसित भारत यात्रेचा निषेध

तरी सर्व जड अवजड वाहन मालक आणि चालक संघटना यांना वाहतूक पोलिसांनी आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोंडी मुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल. तसेच इंधन आणि वेळची बचत होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Source link

khandala ghat trafficMumbai Pune Expressway Newsmumbai pune expressway traffictraffic jam at khandala ghattraffic newsखंडाळा घाट वाहतूक कोंडीमुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीवाहतूक कोंडी बातमी
Comments (0)
Add Comment