मुंबई महानगरपालिकेत चौथी पास उमेदवारांसाठी भरती; ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

Mumbai Mahangarpalika Recruitment 2023 : तुम्ही चौथी पास असाल आणि कुठे नोकरी मिळत नसेल तरी चिंतेचे कारण नाही. तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिके अंतर्गत काम करण्याची एक उत्तम संधी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ही भरती राबवण्यात येणार आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व सायग्नोस्टिक केंद्र’ तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ करता ४ सफाई कामगारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
नुकतीच पालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सदर भरतीमध्ये ‘सफाई कामगार’ पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच, ०१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३-२४ मधील पदे आणि पदसंख्या :

सफाई कामगार : ०४ जागा

एकूण रिक्त पदसंख्या : ०५ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा :
किमान २२ ते कमाल ४५ वर्ष

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २६ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया :
या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

bmc bharti 2023bmc recruitment 2023mumbai mahangarpalika bharti 2023recruitmentमुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment