हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ८३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ४५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १२६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना (Coronavirus) बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत घट झाली असून दैनंदिन रुग्णसंख्या मात्र वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १७० इतकी होती. तसेच, आज बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या ४ हजार ४५५ इतकी आहे. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र किंचित वाढली आहे हा त्यातल्यात्यात एक दिलासा मिळाला आहे. तर आज राज्यात एकूण ४ हजार ८३१ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४ हजार ६५४ इतकी होती. (maharashtra registered 4831 new cases in a day with 4455 patients recovered and 126 deaths today)
आज राज्यात झालेल्या १२६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५९ हजार ९०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- २०५० पर्यंत मुंबईतील ‘हा’ भाग पाण्याखाली जाणार; पालिका आयुक्तांचा इशारा
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांच्या वर
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार ८२१ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ०५४ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार १५१ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ३५६ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ४ हजार ७७२ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ३ हजार ९८० इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांना लागला विजेचा शॉक
मुंबईत उपचार घेत आहेत ३४०६ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ४०६ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ००४, सिंधुदुर्गात १ हजार ०२४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०७१ इतकी आहे.
नंदुरबारमध्ये आज एक रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४२०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७५ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९ वर खाली आली आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्णसंख्या असून येथे फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री-फडणवीस यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…
२,९२,५३० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३४ लाख ५६ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५२ हजार २७३ (१२.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ५३० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.