ठाण्यात ३ कोटींची व्हेल माशाची उलटी घेऊन आले, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, दोघांना अटक

ठाणे : व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाण्यात श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून ताब्यात घेतलेली दगडसदृश वस्तू ही व्हेल माशाची उलटी असून ही उलटी मध्यस्थीच्या मदतीने तीन कोटी रुपयांना विकण्यासाठी आरोपी ठाण्यात आले होते. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द् वन्य प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक १६ येथे दोन जण व्हेल माशाची उलटीच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार बेंद्रे यांच्या पथकाने सापळा रचून मुझमील सुभेदार (४५, रा. श्रीवर्धन, जिल्हा रायगड) आणि शहजाद कादरी (४६, रा. वरवटना , ता. म्हसळा, जिल्हा रायगड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टिक पिशवीत पिवळसर तांबट रंगाचा वेगवेगळ्या आकाराचा पदार्थ सापडला.

Pune Police Beaten: पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगडाने अमानुष मारहाण, प्रकृती गंभीर

पोलिसांच्या चौकशीत हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे समोर आले. ही उलटी मध्यस्थीच्या मदतीने तीन कोटी रुपयांना विकणार होतो, अशी कबुली दोघांनी दिली. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाईल फोन जप्त केले. या दोघांना न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महापुरुषांच्या फलकाचा वाद विकोपाला, गडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ

प्रयोगशाळेत होणार तपासणार

तस्करांकडून ताब्यात घेतलेली व्हेल माशाची उलटी खरी आहे की बनावट याचा छडा लावण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. याठिकाणी तिच्यावर प्रक्रिया करून ही उलटी खरी आहे की बनावट याबाबत माहिती घेतली जाणार आहे. मुख्यतः परफ्युम, उच्च दर्जाचे अत्तर बनवण्यासाठी या उलटीचा वापर होतो. ही उलटी आरोपींनी श्रीवर्धनवरून येथून आणल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून या अनुषंगाने ठाणे पोलीस श्रीवर्धन येथेही तपास करणार आहेत. तसेच आरोपी ठाण्यात नेमके कोणाला ही उलटी विकण्यासाठी आले होते. त्या टोळीचाही शोध सुरु आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य, प्रताप चिखलीकरांचा दावा; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

युगांडाच्या महिलेनं शक्कल लढवली, गुप्तचर विभागाने अचूक हेरली; कोटींचं ड्रग्स जप्त

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

thane policeThane Police Newswhale fish vomitठाणे ताज्या बातम्याठाणे पोलिसांकडून दोघांना अटकठाणे पोलीसव्हेल माशाची उलटीश्रीनगर पोलीस
Comments (0)
Add Comment