जो मॅन्युअल परेरा (रा. कलिना, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. अशोक महादेव थोरात (वय ३५, सध्या रा. एनडीए रस्ता, वारजे, मूळ रा. आष्टी, जि. बीड), गणेश साहेबराव रहाटे (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ रा. अकोले, जि. नगर), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय ४०, रा. हरकानगर, भवानी पेठ) आणि योगेश दत्तू माने (वय ४०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जो परेरा याचा मत्स्यविक्री व्यवसाय आहे. त्याचे आरोपी माने याच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबध होते. परेरा आणि महिला एकत्र राहत होते. परेरा या महिलेला त्रास देत होता. महिलेने ही मााहिती मानेला दिली होती. २० डिसेंबरला माने साथीदारांसोबत मुंबईला गेला. तेथे परेराशी वाद झाल्यामुळे माने आणि साथीदारांनी परेराच्या डोक्यात वार करून खून केला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह चारचाकीत घालून मुळशीत आणला. ताम्हिणी घाट परिसरात मृतदेह फेकून आरोपी पळून गेले.
खंडणीविरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी गोव्याला फरारी होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने खेड-शिवापूर परिसरात सापळा लावून आरोपींना अटक केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शंकर संपते यांनी ही कामगिरी केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News