चपलेचा त्याग, कटिंग न करण्याचा निर्णय; पुण्यातील दोन भावांचा मराठा मोर्चाला अनोखा पाठिंबा

पुणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून ग्रामीण भागातील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहे. यात आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या दोन सख्ख्या मावस भावांनी आनोखे आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावचे असणारे दोन सख्खे मावस भाऊ रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी अनोखे आंदोलन करून पाठींबा दिला आहे. त्यातील रंगनाथ जाधव हे गेल्या तीन महिन्यांपासून चप्पल न घालता अनवाणी फिरून आंदोलनाला पाठींबा देत आहेत. तर शांताराम जाधव यांनी गेल्या चार महिन्यांपासून कटिंग आणि दाढी न करण्याचा पण केला असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आम्ही करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनाची आता चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.

ठाकरेंचा अदानींविरोधात मोर्चा, पवारांकडून २५ कोटींची चर्चा; चेकचा विषय काढत जाहीर आभार
मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात धामणी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात देखील या दोन मावस भावांचा सक्रिय सहभाग होता. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही चप्पल आणि कटिंग, दाढी करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

राज्यभरातल्या ग्रामीण भागतून मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळत आहे. ग्रामीण भागातील तरुणाई जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यातील या दोन सख्ख्या मावस भावांच्या हटके आंदोलनाची चर्चा होऊ लागली आहे.

तो डान्स VIDEO म्हणजे निव्वळ अपघात; बडगुजरांसाठी राऊतांची बॅटिंग, ‘मकाऊ’चा विषय पुन्हा काढला

Source link

dhamane two brothers maratha morcha supportpune dhamane two brothers movementpune marathi newsPune Policeधामणे दोन भाऊ मराठा आंदोलन पाठिंबापुणे धामणे दोन भावांचं आंदोलनपुणे पोलीसपुणे मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment