हायलाइट्स:
- संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू- नीलेश राणे यांचा इशारा.
- शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच- नीलेश राणे.
- संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे- नीलेश राणे.
सिंधुदुर्ग: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांचे सुरू झालेले वाकयुद्ध शमताना दिसत नाही. भाजप नेते, माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय वाद हा अधिकच वाढणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. (bjp leader nilesh rane criticizes shiv sena mp sanjay raut)
माजी खासदार नीलेश राणे हे एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीयांचा वाद अधिकच तीव्र बनला आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना करेक्ट कार्यक्रमाचा उल्लेख करत भाष्य केले होते. आम्ही आणखी एखादा करेक्ट कार्यक्रम करू असे राऊत म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना राणे यांनी हा इशारा दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- … तर सन २०५० पर्यंत मुंबईतील ‘हा’ भाग पाण्याखाली जाणार; पालिका आयुक्तांचा इशारा
खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना नीलेश राणे म्हणाले की, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू.
क्लिक करा आणि वाचा- राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर; देशात महाराष्ट्र अग्रेसर
राऊत यांच्यावर निशाणा साधत असताना नीलेश राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, असा प्रहार करत जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असे ते म्हणाले. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. केवळ शिवसेना अडवा अडवीची कामे करत आहे. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे, असा टोलाही राणे यांनी राऊत यांना लगावला.
क्लिक करा आणि वाचा- महिला प्रसूत झाल्यावर बलात्कार झाल्याचे उघड; सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आली. असे असले तरी ते मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचे होते, असेही ते म्हणाले.