नाशिक : सलीम कुत्ता पार्टी प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. याच प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार करताना सलीम कुत्ता ज्या पार्टीत सहभागी झाला होता, ती पार्टीच भाजपने आयोजित केलेली होती, असं म्हटलंय. सलीम कुत्ता ज्यावेळी बॉम्बस्फोटप्रकरणी जेलमध्ये होता, त्यावेळी गृहमंत्री म्हणून त्याच्या पॅरोल अर्जावर सही कुणी केली? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाउचे व्हिडीओ आणि फोटो पुरविणारे भाजपचेच लोक आहेत. त्या व्हिडीओंशी सुधाकर बडगुजर यांचा संबंध नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सलीम कुत्तासोबतच बडगुजर यांच्या डान्सचा व्हिडीओ हा अपघात होता. विरोधकांना नामोहरम करायचे, ही भारतीय जनता पक्षाची रणनिती आहे, तिला आम्ही बळी पडणार नाही. शिवसेना ही बडगुजरांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच ड्रगमाफिया ललित पाटील याने मालेगावपर्यंत हप्ते पोहचविल्याचा दावाही राऊत यांनी केला.

नाशिकमधील पार्टी भाजपने आयोजित केलेली होती. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला यांना आमंत्रण दिले होते. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे जाणं, बसणं, चर्चा करणं… आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी असल्याचं राऊतांनी आवर्जून सांगितलं.
सलीम कुत्ता संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला ? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा.. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता बॉम्बस्फोटमधला तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं, असंही राऊत म्हणाले. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतः कडे बघावं, असा टोलाही त्यांनी नितेश राणे यांना लगावला.