पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष मोका कोर्ट समोर, सहकार नगर पोलीस ठाणे गु र क्रमांक १४५/२०२३ अंतर्गत मोक्याची कारवाई करून आरोपी चेतन महादेव कांबळे (जामीन अर्ज ६३४२/२३) विशाल शिवाजी पाटोळे ( जामीन अर्ज क्र ७०४२/२३) शुभम अनिल ताक्तोडे (जामीन अर्ज ७०४३/२३) यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांचा सर्वांचे वेग वेगळे जामीन अर्ज त्यांच्या वतीने ॲड. सुशांत तायडे यांनी दोषारोप पत्र (चार्ज शिट) दाखल होण्यापूर्वी दाखल करून वरील सर्व आरोपींची बाजू मांडत युक्तिवाद करून मोका कायद्यातील तरतुदी आणि सदर आरोपी यांना कसे खोट्या गुन्ह्यात अडक विण्यात आले आहे ते मे व्ही आर कचरे साहेब, विशेष मोका न्यायाधीश सो. याच्या निदर्शनात आणून दिले आणि सदर युक्तिवाद ग्राह्य धरत मे कोर्टाने वरील सर्व आरोपींना दोषारोप पत्र दाखल होण्या आधी ५०,०००/- रू. च्या जातमुजलकावर योग्य अटी शर्तिवर जामीन मंजूर केला आहे. सर्व आरोपी यांचे वतीने युक्तिवाद ॲड सुशांत तायडे यांनी केला आणि, ॲड प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी, शुभांगी देवकुळे यांनी कामकाज पाहिले.