सुनील केदारांची प्रकृती बिघडली; मायग्रेनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरु

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बहुचर्चित नागपूर जिल्हा बँक (एनडीसीसी) घोटाळ्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने पाच वर्षांच्या कारवासाठी शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार यांना हृदयविकार, मायग्रेनचा त्रास जाणवला. त्यामुळे शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले.

शनिवारी केदार यांच्या सीटी स्कॅन, एमआरआय व ईकोसह पाच चाचण्या करण्यात आला. शनिवारी मायग्रेन अर्थात अर्धशिशीचा अधिक त्रास होत असल्याची तक्रार केदार यांनी केली. त्यामुळे त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला. ईसीजी चाचणीत त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल आढळून आले. यासह त्यांच्या रक्त व मेंदूशी संबंधित चाचण्याही करण्यात आल्या आहेत. केदार यांना सर्दी व खोकल्याचाही त्रास असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करा!

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे पुणे मेडिकल कॉलेज चर्चेत आले असतानाच नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सध्या सुनील केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासाठी सात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मेडिकल प्रशासनाला देण्यात आले आहेत. शिक्षा झालेला आरोपी अथवा बंदीवानाला दीर्घ काळ विनाकारण रुग्णालयात ठेवल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सुनील केदारांचे पुढे काय? राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क; भाजपकडून मोर्चेबांधणीची तयारी, आमदारकी रद्द होणार?
पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुनील केदार हे सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या कक्षाबाहेर साध्या गणवेशात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, वॉर्ड परिसरातही पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. मेडिकलमधील पोलिस चौकीत तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याला ताब्यात घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Source link

congress mlasmedical hospital nagpurmla sunil kedarNagpur District Bank Scamndcc bank loan casesunil kedar news
Comments (0)
Add Comment