यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट व बायोमेडिकल इंजिनिअर अशा अनेक पदांचा समावेश आहे. एकूण ६५ रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून पात्र असणार्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहेत. या मुलाखती ०२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – १० जागा
वैद्यकीय अधिकारी-आयुष – १ जागा
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – १८ जागा
स्पेशालिस्ट – ३३ जागा
सुपर स्पेशालिस्ट – ०३ जागा
बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६५ जागा
वेतन –
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – ६० हजार
वैद्यकीय अधिकारी-आयुष – ३० हजार
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – ६० हजार
स्पेशालिस्ट – ७५ हजार
सुपर स्पेशालिस्ट – १ लाख २५ हजार
बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर – २५ हजार
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एमबीबीएस, डीएम, बीएएमएस आदि अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
मुलाखतीचा तारीख – ०२ जानेवारी २०२४
अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन (अर्ज प्रक्रियेचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत.)
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तसेच अधिसूचनेसोबत जोडलेला अर्ज अचूक भरणे आवश्यक आहे. मुलाखतीला येताना अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.