हायलाइट्स:
- नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणा
- राणेंच्या टीकेला अजित पवारांचा उत्तर
- पुण्यात प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया
पुणेः ‘अजित पवार (Ajit Pawar) अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, अशी जहरी टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यामंसोबत संवाद साधताना अजित पवारांनी राणेंच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या खात्यावर टीका केली होती. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. त्यावर उत्तर देताना नारायण राणेंनी आज पवारांवर टीका केली होती. अजित पवार अजून अज्ञान आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. नारायण राणेंच्या टीकेवर अजितदादांनी अधिक चर्चा करणं टाळलं आहे.
वाचाः नारायण राणेंचा अजित पवारांना थेट इशारा, यात्रेचा शेवटच्या दिवशी म्हणाले…
‘मला या गोष्टीची जास्त चर्चाच करायची नाही. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे. ते आम्ही चालवत आहोत. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांचं केंद्राचं काम करावं आम्ही आमचं राज्याचं काम करतो,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः ‘यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी गेली’; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार
नारायण राणे काय म्हणाले?
‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेसे कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे. माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून एक कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहतात अर्थखातं पैसे देणार,’ असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
वाचाः शिवसेना घडवायला आमचाही हातभार; राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा