काळ आला पण…! हॉटेलमध्ये अचानक कोसळली; एनसीसी विद्यार्थ्यांची हुशारी अन् महिलेला मिळाले जीवनदान

सोलापूर: सोलापूर मंगळवेढा हायवेवर कामती गाव आहे. या हायवेर अनेक हॉटेल्स आहेत. शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी एका हॉटेलमध्ये एक महिला चहा पिण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान बेगमपूरहून सोलापूरला निघालेला संतोष पाटील हा एनसीसीचा विद्यार्थी त्याठिकाणी चहासाठी थांबला होता. ती महिला अचानक खाली कोसळली. जवळच असलेल्या लोकांनी धाव घेतली. काहींनी तिचे पाय चोळले तर काहींनी कांद्याचा वास दिला.
रायगड हादरलं! मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ
दरम्यान एनसीसीच्या संतोषने धाव घेतली. त्याने त्या महिलेला हलवून पाहिले. तिचा श्वास थांबला होता. त्याने पटकन हाताच्या तळव्यांनी तिच्या छातीवर सीपीआरचा हळुवार भार दिला. काही वेळाने ती शुद्धीवर आली. तिने डोळेही उघडले. काही वेळ तसेच पडून राहिल्यावर ती महिला खुर्चीवर बसली. एनसीसीचा विद्यार्थी संतोष याने हृदय बंद होऊन बेशुद्ध झालेल्या महिलेला सीपीआर देत शुद्धीवर आणले. तिथे असलेल्या नागरिकांनी त्या महिलेला पाणी आणि चहा आणून दिला. थोड्या वेळात त्या महिलेचा नातू तिथे आला. नातवाने महिलेला हॉस्पिटलमध्ये नेले.

अजितदादांनी शिरुरसाठी दंड थोपटले, अमोल कोल्हे म्हणाले; जनता सुज्ञ, ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं…!

संतोष पाटील याने क्षणाचाही विलंब न करता त्वरित सीपीआर दिल्यामुळे महिलेचा जीव वाचला. अडचणीच्या वेळी क्षणात घेतलेला निर्णय एखाद्याचे प्राण वाचले. देव तारी त्याला कोण मारी, अशी एक मराठीत म्हण आहे. काळ आणि वेळ जुळून आली की माणसाचा घात होतो, असेही म्हणतात. पण एकेकावेळी दैवही बलवत्तर ठरत असते. तिथे मात्र वेळ आणि काळ यांना हतबल व्हावे लागते. असाच एक मानवतेचा प्रसंग मोहोळ तालुक्यातील कामतीच्या एका हॉटेलमध्ये घडला. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या एनसीसीच्या एका विद्याथ्यनि सीपीआरचा वापर करून बेशुद्ध पडलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याने त्या छात्राची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Source link

ncc students saved womanncc students saved woman lifencc students saved woman life by giving cprncc students saved woman life in solapursolapur newsएनसीसी विद्यार्थ्यांने महिलेचा जीव वाचवलासोलापूर बातमी
Comments (0)
Add Comment