अजितदादा म्हणाले, अमोल कोल्हेंना पाडणार, सुप्रिया सुळे म्हणाल्या, असले उद्योग…

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली आहे. शिवाय त्यांनी पक्ष चिन्ह व पक्षावर दावा सांगितला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पक्षात फूट नसून पक्षाची स्थापना कोणी केली आणि अध्यक्ष कोण आहे हे सर्वांना माहिती आहे असे वारंवार सांगितले आहे. असे असले तरी शरद पवार गट आणि अजित पवार गटातर्फे विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले फलक दिसून येतात. याचं ताज उदाहरण म्हणजे बारामतीत शनिवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले फलक कार्यक्रमात दिसून आले.

असे असतानाच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर आज पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच असा प्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे आज इंदापूर दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आम्ही सत्तेत असताना असले उद्योग केले नाहीत

सुळे म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. विरोधात बोलला की संसदेतून बाहेर काढा. ईडी-सीबीआय-इन्कम टॅक्सची भीती दाखवा. ही भ्रष्ट जुमला पार्टीची पद्धत आहे. आमच्यासाठी ही लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही सत्तेत असताना कोणावर असले उद्योग व सुडाचे राजकारण केले नाही आणि कधी करणार ही नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.

मी मेरिटवर तिकीट मागितले आहे

मी जयंत पाटील यांच्याकडे तिकीट मिळावं यासाठी मागणी केली आहे. तुम्ही शरद पवारांना उभं करून माझं तिकीट कापताय काय ? मी मेरिटवर तिकीट मागितले आहे. सुप्रिया सुळे यांची सगळ्यात मोठी ताकद ही सुप्रिया सुळे यांची इमानदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.

दीपक पडकर यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

ajit pawaramol kolhe shirur loksabhaSupriya Sulesupriya sule on amol kolheअजित पवारअमोल कोल्हेशिरूर लोकसभासुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment