राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले

पुणे: मी ३८ वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्या वेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच आज कुणी काही केले त्याचीही मला तक्रार करायची नाही, असेही पवार म्हणाले.
फालतू चर्चा बंद करा, लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा : प्रकाश आंबेडकर
पवार यांनी सोमवारी भीमथडी जत्रेला भेट दिली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या कोणी काय केले, यावर मला बोलायचे नाही, असे सांगत, फक्त लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, त्याचा संस्थापक कोण आहे ? या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर आहेतच. त्यामुळे यावर मला अधिक चर्चा करायची नाही, असेही शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये मागील दहा वर्षात माझे कोणत्याही कामात लक्ष नाही. येथील स्थानिक निवडणुका, साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांबाबत मी निर्णय घेतलेले नाहीत.या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. सर्वांना बरोबर घेऊन केवळ या भागाचा विकास व्हावा, ही माझी इच्छा आहे. राज्यातील नवख्या तरूणांना मी कायमच प्रोत्साहन देतो, असे शरद पवार म्हणाले.

अजितदादांनी शिरुरसाठी दंड थोपटले, अमोल कोल्हे म्हणाले; जनता सुज्ञ, ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं…!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हे मीच ठरवेन, असेही शरद पवार म्हणाले. आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते. आपल्यावर कारवाई होईल म्हणून काही लोक सत्तेत गेले. भाजपबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची ‘स्क्रीप्ट’ वाचावीच लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जे झाले, तेच आता अजित पवार यांच्याही बाबतीत होत आहे. भाजपला पवार परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केली.

Source link

lok sabha elections newsPune newsSharad Pawar newssharad pawar on lok sabha electionsपुणे बातमीलोकसभा निवडणुक बातमीशरद पवार बातमी
Comments (0)
Add Comment