हायलाइट्स:
- केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार- अजित पवार.
- एकीकडे केंद्र सरकार करोनाची काळजी घ्यायला सांगते, दुसरीकडे यात्राही काढालयाल सांगते- अजित पवार.
- जिथे राजकारण करायचे आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जेथे जनतेचा प्रश्न आहे, तेथे सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे- अजित पवार.
पुणे: केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील ४ मंत्र्यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढल्या. यांपैकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपच्या या चारही मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रे गेली, त्या त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. (coronavirus will increase due to jan ashirwad yatra says dy cm ajit pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजप मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधताना पवार यांनी केंद्र सरकार देखील टीकास्त्र सोडले. देशातील सर्व राज्यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गांभीर्याने घ्यावी असे केंद्र सरकारने सांगितले आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगत आहे. असे असतानाही दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या नव्या मंत्र्यांना यात्राही काढायला सांगत आहे. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जेथे जेथे यांची जन आशीर्वाद यात्रा गेली, तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसेल, असे अजित पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांना लागला विजेचा शॉक
करोना अजून गेलेला नसून करोनाची काळजी घ्यावी लागेल असे केंद्र सरकार सांगत आहे, मग चार नवीन मंत्र्यांना यात्रा काढायला सांगितले जाते त्याचे काय?. याला कोण जबाबदार आहे?, असे सवाल उपस्थित करतानाच, नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असेही अजित पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- … तर सन २०५० पर्यंत मुंबईतील ‘हा’ भाग पाण्याखाली जाणार; पालिका आयुक्तांचा इशारा
जिथे राजकारण करायचे आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जेथे जनतेचा प्रश्न आहे, तेथे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करायला हवे. आता सण येत असून सण साजरे करताना काळजी घेणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी रिक्षा चालवताना पाहिलंय का?