आयपीएलसारख्या टीम बदलू नका, एकच संघ निवडा, ठाकरे गटाच्या नेत्याला विखेंच्या पायघड्या

अहमदनगर : तुमच्या तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज आहे, समोरून कसाही बॉल आला, तरी टोलावता आला पाहिजे, फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा, अशी शाब्दिक फटकेबाजी करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात निशाणा साधलाय. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांना आता एकच संघ निश्चित करण्याचा सल्लाही विखेंनी दिला.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विखे पाटलांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन एकवीस वर्षांपासून करण्यात येते. यंदाही या स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

पार्थ पवारांचं काय चाललंय? अजितदादांचं मावळ लोकसभेवर विशेष लक्ष, लेकाच्या मात्र दांड्या सुरुच
स्पर्धेचे औचित्य पाहून विखे पाटील यांनी क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी करत केलेल्या सूचक वक्तव्याला उपस्थितांनी दाद दिली. या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत. तसेही या तालुक्याला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. फिल्डींगचे काम माझ्यावर सोडा असे विखे म्हणाले.

ठाकरेंच्या ‘प्रामाणिक शिलेदारांनी’च साथ सोडली, नवी मुंबईत राजकीय भूकंप
जनार्दन आहेर यांना सल्ला देताना आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा आयपीएल सारखे संघ बदलू नका. आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या पिछेहाटीला बाबा जबाबदार, विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Balasaheb Thoratradhakrishna vikhe patilUddhav Thackerayअहमदनगर बातम्याअहमदनगर राजकीय बातम्याउद्धव ठाकरेजनार्दन आहेरबाळासाहेब थोरातराधाकृष्ण विखे-पाटील
Comments (0)
Add Comment