पाच एकर शेती पदरी दोन मुले, तसा संसार सोन्याचा, पण मोठ्या ज्ञानेश्वरला दारूचा नाद लागला अन सुखी कुटुंबाला ग्रहण लागले. ज्ञानेश्वरचे वडील देव दर्शनासाठी परळी वैजनाथला गेले होते. तिकडूनच ते पंढरपूरच्या वारीसाठी जाणार होते पण परळीतच असताना त्यांच्या लहान मुलाचा फोन आला अन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला मोठ्या भावाने बेदम मारलं आहे ती जनू शेवटच्या घटका मोजत आहे हे ऐकून ते खालीच बसले. त्यांना काहीच सुचेनासे झाले. अशा परिस्थितीतच तासाभराने त्यांना दुसरा फोन आला अन आयुष्य पत्नीच्या निधनाने आयुष्यच उध्वस्त झालं. कसेबसे ते लातूरला पोहचले.
शासकीय रुग्णालयातून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला. आपल्या अर्धांगिनीला आपल्याच पोटच्या पोरानं असं क्रूरपणे संपवावं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असाच प्रश्न त्यांच्या मनाला पडलाय. हे कमी काय म्हणून पोलिसांच्या संशयाच्या टप्प्यात आले. त्यांना चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी चांगलाच चोप दिला. मात्र, आपला काही हात नसल्याचे ते वारंवार पोलिसांना सांगू लागले. दरम्यान, फरार ज्ञानेश्वरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्यानेही हा खून वडिलांनीच केल्याचा आव आणून वडिलांनाच या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
या प्रकरणी ज्ञानेश्वरने दारुसाठी आई संगीताला पैसे मागितले असणार तिने दिले नसल्याने त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले असावे, अशी तक्रार ज्ञानेश्वर मुंडेचे वडील नाथराव त्र्यंबक मुंडे यांनी किनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलिसठाण्यात मुलगा ज्ञानेश्वर मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसउपनिरीक्षक तोटेवाड यांनी दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News