बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली असतानाच या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेतही अनेक सिनेमांनी स्वत:ला सिद्ध केले.. चला जाणून घेऊया चौथ्या दिवशी चित्रपटाची परिस्थिती कशी होती.
प्रभासच्या ‘सालार’च्या एक दिवस आधी, शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अॅडव्हान्स बुकिंग दरम्यान दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ हा २०२३ मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. रिलीजनंतर चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई होत असल्याचे पाहायला मिळते.
‘सालार’ने जबरदस्त ओपनिंग करून इतिहास रचला
ओपनिंगसह ‘सालार’ने ‘डंकी’चा पराभव केलाच. तसेच ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनाही मागे टाकले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ९०.७ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली. रविवारी या सिनेमाने ६२.०५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत हा चित्रपट ‘जवान’पेक्षा मागे पडला आहे.
प्रभासचा ‘सालार’ ‘जवान’च्या मागे
‘जवान’ने रविवारी चौथ्या दिवशी ८०.१ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘सालार’ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ४२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने आतापर्यंत देशभरात २५१.६० कोटींची कमाई केली आहे. तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करत आहे, पण चार दिवसांच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘सालार’ आता ‘जवान’च्या मागे पडला आहे. ‘जवान’ने चार दिवसांत २८६.१६ कोटींची बंपर कमाई केली होती.
‘सालार’चे जगभरातील कलेक्शन
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास तीन दिवसांत ४०२ कोटींची कमाई करून सालारने इतिहास रचला. ‘सालार’ने प्रभासचा यापूर्वीचा सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ला खूप मागे टाकले आहे. ‘बाहुबली २’ ने एका आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर २४७ कोटींची कमाई केली होती.