राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेत भरती, आजच करा अर्ज

NHM Amravati Recruitment 2023 -24: तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर अमरावती जिल्ह्यात उत्तम संधी चालून आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना यांच्या अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत परिषदेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

यामध्ये स्त्री वैद्यकिय अधिकारी, एएनएम/स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता या पदांचा समावेश असून एकूण ०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २९ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.

Pune Job Fair 2023: ‘या’ दिवशी पुण्यात शासनाचा रोजगार मेळावा; १ हजारांहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषद अमरावती भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
स्त्री वैद्यकिय अधिकारी – ०२ जागा
एएनएम/स्टॉफ नर्स – ०२ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०२ जागा
औषधी निर्माता – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०८ जागा

शैक्षणिक पात्रता –
स्त्री वैद्यकिय अधिकारी – एमबीबीएस उत्तीर्ण आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी असावी.
एएनएम/स्टॉफ नर्स – एएनएम/ जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असावे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – विज्ञान शाखेतून बारावी आणि डीएमएलटी उत्तीर्ण असावे.
औषधी निर्माता – डी फार्मसी किंवा बी फार्मसी उत्तीर्ण असावे

वेतन – (मासिक)
स्त्री वैद्यकिय अधिकारी – शैक्षणिक पात्रतेनुसार ४० हजार ते ६० हजार
एएनएम/स्टॉफ नर्स – १८ हजार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १८ हजार
औषधी निर्माता – १८ हजार

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा स्त्री रुग्णालय, (ई.एम.एस. विभाग १०८) अमरावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद, अमरावती’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २९ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

NHM Amravati Bharti 2023NHM Amravati Recruitment 2023-24recruitmentZP Amravati Recruitment 2023जिल्हा परिषद अमरावती भरती २०२३राष्ट्रीय आरोग्य अभियान २०२३
Comments (0)
Add Comment