रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
कांग्रेस आमदार रवींद धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते मी कोणतीही निवडणूक लढवू शकतो. पक्षानं उद्या सांगितल तर उद्या निवडणूक लढवेन, असं देखील ते म्हणाले. पुणे लोकसभा निवडणुकीत विरोधात कोणीही उमेदवार असला तरी लढण्याची तयारी असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
बावनकुळेंच्या घोषणेवर धंगेकर काय म्हणाले?
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत झाली होती. या पोटनिवडणुकीत मविआची भक्कम साथ मिळाल्यानं रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. तर, हेमंत रासने यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
चंद्रशेखर बावनकुळेंनी काल जे वक्तव्य केलं ते त्यांचा पक्षाचा विषय आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल कसब्यातून हेमंत रासने यांना पुन्हा उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात बोलताना रवींद्र धंगेकर यांनी जनतेला गृहीत धरून चालणार नाही, असं म्हटलं. जनता सर्व ठरवत असते, असं धंगेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारानं विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा की काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार हे मतदारांच्या हाती असून आतापासून पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कालचं पुण्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
Read Latest Maharashtra News And Marathi News