अमोल कोल्हेंचं नाव काढताच अजितदादा पत्रकारांवर वैतागले, दोन वाक्यात विषयच संपवला

पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. अमोल कोल्हे यांना ओपन चँलेंज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा शिरुरमध्ये धडकल्याने साहजिकच त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली. अजितदादांनी पालकमंत्री या नात्याने आज मांजिरी येथील विविध प्रकल्प आणि विकास कामांची पाहणी केली. हडपसर मांजरी हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या भागात येतो. आजच्या दौऱ्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, प्रदेशउपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली. त्यावर अजित पवार चांगलेच वैतागले. पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती होत असताना नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात ‘एक मिनिट’ म्हणत त्यांनी पत्रकारांचे बोलणे तोडले आणि त्यानंतर मोघम प्रतिक्रिया देत अजित पवारांनी हा विषय संपवला.

मी काल अमोल कोल्हे यांना दिलेल्या चँलेंजचा आणि आजच्या दौऱ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अधिवेशन सुरु असतानाच चेतन तुपे यांनी मला याठिकाणी बोलावले होते. पण मी त्याला सांगितलं होतं की, अधिवेशन संपल्यावर आपण पाहणी करु. त्यामुळे मी आज इथे आलो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मी सकाळी पाहणी केली, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी पत्रकारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्या प्रतिक्रियेच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांना छेडले. त्यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ. मी काल सांगितलं आहे आणि ते माझं फायनल आहे, अशी इनमीन दोन वाक्य बोलून अजित पवार यांनी हा विषय संपवला.

शिरुरची जनता निधीपेक्षा मूल्य आणि तत्त्वाला जास्त महत्त्व देते; अमोल कोल्हेंचं अजितदादांना प्रत्युत्तर

अमोल कोल्हे काय म्हणाले?

अमोल कोल्हे यांनी आज सकाळी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, आदरणीय अजितदादा हे मोठे नेते आहेत. ते माझ्यावर टीका करत आहेत. पण मी आहे तिथेच आहे, त्यांनी भूमिका बदलली आहे. अजित पवार हे आमचे नेते होते. त्यामुळे अजित पवार यांना उलट उत्तर देणे हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारे नाही. अजित पवार यांच्याविषयी आजही माझ्या मनात व्यक्ती म्हणून आदर आहे. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं, हा माझा गौरव आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांचा पाहणी दौरा

Source link

ajit pawarAmol Kolheamol kolhe vs ajit pawarlok sabha election 2024ncpअजित पवारअमोल कोल्हेशिरुर लोकसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment