आयआयटी मुंबईला तब्बल ६४ कोटींची देणगी, माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: आयआयटी मुंबईतील संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांनी ६४ कोटी रुपयांची देणगी देऊ केली आहे.

आयआयटीमधून १९९८मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ही ५७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या एका तुकडीने संस्थेला दिलेल्या देणगीपैकी ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे. आयआयटी मुंबईला गेल्या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १९७१च्या तुकडीने ४१ कोटी रुपयांची देणगी दिली होती. यंदा या देणगीत आणखी वाढ झाली आहे.

माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या देणगीचा शैक्षणिक उपक्रम आणि संशोधन प्रकल्पांसाठी हातभार लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक वसतिगृह, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण संशोधनांना चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी याची मदत मिळणार आहे, असे आयआयटी प्रशासनाने सांगितले. आयआयटीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत. तसेच या संस्थेला ते विविध माध्यमातून आपले योगदान देत आहेत, असे अॅकॅडमिक आणि इन्फ्रास्ट्रक्चरल अफेअर्सचे डेप्युटी डायरेक्टर प्रा. एस. सुदर्शन यांनी सांगितले.

सुंदर मुंबईसाठी शिंदेंकडून प्रयत्न, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम

Source link

iit mumbaiiit mumbai donationmumbai newsआयआयटी मुंबईआयआयटी मुंबई देणगीमुंबई न्यूज
Comments (0)
Add Comment