नुकतीच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०४ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे,पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
महाव्यवस्थापक (वित्त)/ मुख्य वित्त अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – आयसीएआय येथील चार्टर्ड अकाऊंटन्ट पदवी प्राप्त. (या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)
वेतन – ३ लाख २७ हजार ते ३ लाख ७० हजार (मासिक)
वयोमर्यादा – ३८ वर्षे ते ५५ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०४ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.