जरागेंचा मुंबईत धडकण्याचा निर्धार, गिरीश महाजन म्हणाले, ती वेळ येणार नाही, आधीच….

नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यांच्या याच विधानावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र जरांगे पाटील यांच्यावर ती वेळ येणार नाही, त्यापूर्वी समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले गिरीश महाजन?

सरकार वेगाने काम करत आहे. क्युरेटिव्ह पीटिशन मान्य झाली आहे. त्यातून आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत की मराठा समाज मागास कसा आहे. शिवाय मागासवर्गीय आयोग देखील आपले काम करत आहे. त्यांचा रिपोर्ट आला की आम्ही विधानसभेचे सत्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, अशी ग्वाही महाजन यांनी दिलीये.

मनोज जरांगेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन ओबीसी आंदोलकांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
सरकार प्रामाणिकपणे आणि वेगाने काम करीत आहे. महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल. दरम्यान मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत. मात्र समाजाला पण मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. तो पर्यंत समाजाला न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल. जरांगे पाटील किंवा समाजाला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, असं महाजन म्हणाले.

मनोज जरांगेच्या ‘सगेसोयरे’ शब्दामुळे मराठा आरक्षणाचा तिढा वाढला; नातेवाईकांच्या आरक्षणावर ठाम
शिंदे गटाएवढ्याच जागा अजित पवार यांना देणार? महाजन म्हणाले…

लोकसभेला अजित पवार गट शिंदे गटा एवढ्याच जागा मागत आहे. यावर मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. तो प्रश्न वरिष्ठ स्तरावरचा आहे. दिल्लीलाच याबाबत ठरेल. त्यावेळेस दोन्ही पक्षाचे नेते, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते त्याठिकाणी असतील, हा काही आमच्यासाठी वादाचा विषय नाही, आमच्यामध्ये अतिशय चांगल वातावरण आहे. सर्वच्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असे गिरीष महाजन म्हणाले.
मनोज जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार; ट्रक-ट्रॅक्टर्सना छत लावा, महत्त्वाची ‘रसद’ सोबत घेण्याच्या सूचना
संजय राऊतांना प्रत्युत्तर

मोदी म्हणजे विष्णूचे तेरावे अवतार अशी उपरोधिक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत. संपूर्ण देशात दिवाळीपेक्षा मोठा सण देशभरात साजरा होणार आहे. म्हणून त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे, अशी टीका मंत्री गिरीष महाजन यांनी केली.

संजय राऊत हे वेगवेगळे कारण सांगत त्यांच्या बुध्दी प्रमाणे ते बोलत आहेत. आम्हाला आमंत्रण का नाही, मी हेच सांगतोय राष्ट्रीय पक्षांना आमंत्रण दिलं गेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष नाही ,तर राज्याचा देखील पक्ष राहिला नाही, असा चिमटा महाजनांनी काढला. केंद्राच्या सूचीमध्ये आहे, अशाच नेत्यांना तिथं बोलावण्यात आलं आहे. असे गिरीश महाजन म्हणाले.

Source link

Girish Mahajanmanoj jarange patilmanoj jarange patil mumbai agitationMaratha Reservationminister girish mahajanगिरीश महाजनमनोज जरांगे पाटील
Comments (0)
Add Comment