यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशील याची सविस्तर माहिती घेऊया.
‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रशासकीय सदस्य – १५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १५ जागा
पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवाराला समकक्ष पदाच्या प्रशासकीय कामाचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयोमर्यादा – कमाल वय ५० वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली- ११०००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.