तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख शेख
इकबाल शेख यांनी पोलीस दलात नव्याने रुजू होणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांना नाशिक येथे केले मोलाचे मार्गदर्शन….
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. इकबाल शेख पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना सीसीटीएनएस व गुन्हे प्रकटीकरणांमध्ये सीसीटीएनएस तसेच इतर केंद्र शासन व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र (NCRB) यांचेकडून गुन्हे प्रकटीकरणासाठी भारतीय पोलीस दलास उपलब्ध करून दिलेल्या अनेक पोर्टल्सबाबत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने रुजू झालेले आणि सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 15 नवप्रविष्ठ पोलीस उप-अधीक्षक व 830 नवप्रविष्ठ पोलीस उप-निरीक्षक (सत्र क्र. 123 व 124) दर्जाचे पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच सर्व अधिकारी दिनांक 05/01/2024 रोजी एकवर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली सेवा बजावण्याकरिता रुजू होणार आहेत.
पोलीस उप-अधीक्षक व पोलीस उप-निरीक्षक दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सीसीटीएनएस या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणे करीता तज्ञ व्याख्याते म्हणून श्री. इकबाल शेख यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे आमंत्रित करण्यात आले होते. सदर व्याख्याना दरम्यान श्री. इकबाल शेख यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना “गुन्हे प्रकटीकरणासाठी सीसीटीएनएस प्रणालीचा उपयोग व इतर शासकीय विभागांशी सीसीटीएनएस प्रणालीचा समन्वय” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
श्री. सचिन गोरे, पोलीस अधीक्षक तथा उपसंचालक (बाह्यवर्ग), श्री. जयंत राऊत, पोलीस उप-अधीक्षक तथा उप संचालक, श्रीमती सिमा परिहार, पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक व श्री. विजय तलवारे, पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक, श्री. बावीसकर, पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक संचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक यांचेकडून पुष्परोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांनी श्री इक्बाल शेख यांच्या व्याख्यानाचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले आहे.