भाजपने मशिन बारामती! अंकिता पाटील यांची भावी खासदार; इंदापूरात फ्लेक्स झळकले…

इंदापूर: मागील अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार भाजपचाच असेल असे भाजपकडून वारंवार बोलले जात आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवणार असल्याचे बोलले जात आहे त्यातच आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर मध्ये त्यांचा भावी खासदार म्हणून फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राज्याचे माजी सहकारमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या व भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदारचे फ्लेक्स बोर्ड झळकले असून, सोशल मिडीयावर ही अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. भाजपने यापूर्वीच ‘अे फॉर अमेठी’ व ‘बी फॉर’ बारामती अशी घोषणा करुन २०२४ च्या लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला आहे. भाजपने मशिन बारामती सुरु केले आहे.

भारतीय जनता पक्षाने बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये युती तर्फे महादेव जानकर व २०१९ च्या निवडणूकीमध्ये कांचन राहुल कुल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची गणिते बदलली आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली असल्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजप व मित्र पक्षाची ताकद वाढणार आहे.

सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…

अंकिता पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची जबाबदारी दिली आहे. अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदार संघ पिंजुन काढण्यास सुरवात केली आहे.तसेच युवकांचे संघटन सुरु आहे.खडकवासला लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा जास्त प्रभाव आहे. बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढविल्यास भाजप व मित्रपक्षांना निवडणूक जिंकणे सोपे जाईल असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. मात्र आज त्यांच्या वाढदिवसादिवशी भावी खासदार असे फ्लेक्स बोर्डे लावले असून सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा पोस्ट केल्या असल्यामुळे अंकिता पाटील यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरु झाली आहे.

Source link

ankita patil as future mpharshvardhan patil daughterIndapurअंकिता पाटील भावी खासदारहर्षवर्धन पाटील
Comments (0)
Add Comment