राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काढलेले चित्र वादात? ठाकरे गटाकडून निषेध, वाचा नेमकं प्रकरण

धुळे: अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या २३ जानेवारीला होणार असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या विविध जाहिराती भाजपाकडून केल्या जात आहे. यात करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये बाल रूपात असलेल्या श्री रामाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंदिरात घेऊन जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने धुळ्यात निषेध व्यक्त करीत हेच का भाजपाचे हिंदुत्व? असा प्रश्न भाजपला विचारला आहे.
तरुणानं महिलेला संपवलं; ४ वर्षांनंतर गुन्ह्याची उकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या भाजपा आणि शिवसेनेत चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्लाबोल करत जे प्रभू श्री रामाला हात धरुन मंदिरात नेत आहे. हा समस्त देशातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य आहे. अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा निषेध यावेळी करण्यात आला.

जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्यापूर्वी मराठा समाजाला न्याय मिळेल | गिरीश महाजन

धुळ्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाशित केले. हे पोस्टर हातात घेऊन शिवसेना कार्यालय ते आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर पायी मार्च काढत निषेध व्यक्त करत भाजपला सत्तेचा माज आल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तारी यांनी यावेळी केला.

Source link

dhule newspicture created by bjpram temple newsthackeray group protestedअयोध्या राम मंदिरधुळे बातमी
Comments (0)
Add Comment