एकीकडे करोनाचं सावट, दुसरीकडे घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले, नागरिकांमध्ये घबराट

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: वारंवार खोकला येणे, घसा खवखवणे, सर्दीमुळे नाक बंद होणे किंवा वांरवार शिंका येणे अशी लक्षणे असणारे रुग्ण शहरात घरोघरी दिसून येत आहेत. यातच राज्याच्या काही भागात करोना पसरत असल्याचे वृत्त धडकल्याने नागरिक धास्तावले आहे. पण, काळजी न करता सर्दी-खोकला असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांत वाढ झाल्याने या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत. सध्या आढळणाऱ्या सर्वाधिक रुग्णांत कोरडा खोकला आहे. हा त्रास १८ ते ४५ या वयोगटांतील नागरिकांना होत आहे. हवा प्रदूषणाचे प्रमाणही थंडीत जास्त असते. त्यामुळे मास्कचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ऑक्टोबरपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण असल्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशा वातावरणात विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ताप चार ते पाच दिवसांत बरा होतो; परंतु उपचारांचा कालावधी पूर्ण न करणे, स्वत:च्या मनाने औषधे घेणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे या कारणांमुळे काही रुग्णांचा खोकला बरा होण्यास वेळ लागतो.

राज्यात हुडहुडी, जळगावात नीचांकी तापमान; पारा ९.६ अंशांवर पोहोचला
वातावरणातील उष्णता कमी झाल्यावर विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असते. याच कारणामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सुट्यांमुळे सध्या अनेकजण बाहेर जात आहेत. परत आल्यानंतर सर्दी- खोकला अशी लक्षणे असतील तर त्यांनी लगेच डॉक्टरांकडे जावे व गरज असल्यास त्यांच्या सल्ल्यानुसार कोव्हिड तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. सुशांत मुळे यांनी सांगितले.

तापातून होताहेत लवकर बरे

वातावरणातील बदलांमुळे शहरात सध्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, सध्या आढळून येणारे रुग्ण तापातून लवकर बरे होत आहेत. ताप गेला तरी खोकला लवकर बसत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. साधारणत: करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर खोकल्याचा मुक्काम वाढला आहे.

आजारामागची कारणे…

– वाढलेले प्रदूषण

– वातावरणातील बदल

– बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन

– बांधकामांमुळे होणारी धूळ

– मास्कचा वापर न करणे

– उपचारांचा कालावधी पूर्ण न करणे

– थंड हवा

करोना रुग्णांमध्ये वाढ, नवा प्रकार कसा आहे, किती घातक आहे, जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

air pollutioncold waves in nagpurcough and coldNagpur newsnagpur weatherwinter
Comments (0)
Add Comment