मुस्लीम युवती निघाली रामलल्लाच्या दर्शनाला, राम मंदिर उद्घाटन सोहळा अनुभवण्यासाठी पायी प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील मंदिर वादावरून जेथे दोन समूहांमध्ये एकेकाळी टोकाचा तणाव होता त्याच मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राहणारी मुस्लीम युवती शबनम शेख ही मुस्लीम युवती बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या दोन मित्रांसमवेत मंदिर सोहळ्याचा क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येला निघाली आहे. प्रवासाच्या पाचव्या दिवशी सोमवारी ती नाशिकमध्ये पोहोचली.

येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील भाविक यासाठी आयोध्येकडे प्रस्थान करीत आहेत. शबनम दोन मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे. त्यांच्या प्रवासाचा सोमवारी पाचवा दिवस होता. नाशिकमधून प्रस्थान करीत ते आता अयोध्येकडे पायी निघाले आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीहीबाजूंनी विचार केला जावा, अशी अपेक्षा शबनमने व्यक्त केली. लहानपणापासून रामायण कानावर पडले. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल मनात आदरभाव व उत्सुकता आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या वारी सुरू असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. या तीनही युवकांनी आपल्यासोबत, ग्रीन इंडिया, क्लीन इंडियाचे बॅनर घेऊन स्वच्छतेचाही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही?
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमासाठी देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पद्धतीनुसार अयोध्येच्या श्रीराम मंदिरातही पूजा होणार

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

muslim girl shabnam shaikhNashik newsram temple inaugurationshabnam shaikhअयोध्या राम मंदिरनाशिक न्यूजराम मंदिर उद्घाटनशबनम शेख
Comments (0)
Add Comment