पुण्यावर माझं विशेष प्रेम पण मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही: देवेंद्र फडणवीस

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपने राज्यात जोरदार तयारी सुरु केली असून भाजपने ४० पेक्षा जास्त खासदारांच्या विजयाचा चंग बांधला आहे. यात पुण्याच्या लोकसभा मतदारसंघवर राज्य भाजपने विशेष लक्ष दिले आहे. मात्र भाजपचा पुणे लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

पुण्यावर माझ विशेष प्रेम आहे.पण उद्या लगेच बातम्या येतील की पुण्यातून लढणार पण आधीच सांगतो की मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे.

माझ्या डोक्यात तसं काही नाही, मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभेच्या मैदानातून माघार?

पुणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची होती चर्चा सुरु

२०२२ साली देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्यावी यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने लॉबिंग केली होती. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे. असं म्हंटल होत.

मात्र त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगत या चर्चांवर पडदा टाकला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपलं पुण्यावर विशेष प्रेम आहे पण आपण पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत असं म्हणत नवी चर्चा सुरु करुन दिली आहे.

जागा भाजपची, अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाने शड्डू ठोकला, पुणे लोकसभेच्या निवडणुकीत ट्विस्ट

पुणे येत्या काळात देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र असेल: फडणवीस

येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडीएची क्षमता आहे. नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे.म्हणून रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल, असे पॅकेज देण्यात येईल. पुण्याच्या विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. देशाचे येत्या काळातील महत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल. असं फडणवीस म्हणाले आहेत.

एक फुल्ल दोन हाफ अशी सरकारची स्थिती, तिघे मिळून राज्य साफ करतायत, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Source link

bjpDevendra Fadnavisloksabha election 2024Maharashtra politicspune bypollpune lok sabha constituencyPune newsदेवेंद्र फडणवीसपुणे लोकसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment