लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: छगन भुजबळ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे. ‘शिवसेना शिंदे गटाचे जेवढे आमदार महायुतीत आले, तेवढेच आमचेही आमदार आले आहेत. त्यामुळे जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच अजित पवार गटाला मिळायला हव्या,’ अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. लोकशाही असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. जे मंत्री त्यांच्याशी चर्चा करीत आहेत तेच यावर बोलतील, असे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर अधिक भाष्य करणे टाळले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरू आहे. जरांगे पाटील आणि भुजबळ यांना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे भुजबळांनीही सबुरी घेतली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरुन वादाची ठिणगी, पुण्यात अजितदादांच्या गटाविरुद्ध शिंदे गट-भाजपची एकी

छगन भुजबळ म्हणाले…

– जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, लोकशाहीत सर्वांना हक्क

– महायुतीतील जागा वाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली भूमिका योग्यच

– निवडणुका आल्या की आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जाते असे सांगत अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले

– नाशिकमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा

– येवल्यातील काळे झेंडे दाखविण्याच्या प्रकरणात दोन पत्रकारांचाही समावेश असल्याचा आरोप

– २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनावरही बोलणे टाळले

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाण नकोसा, कमळावर लढण्याचे वेध? नाना पटोले म्हणाले…

‘माझ्यामागे असंख्य नागरिक’

मंत्रिमंडळात भुजबळ यांचे ऐकले जात नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ‘मी एकटा पडलो नसून माझ्यामागे असंख्य नागरिक आहेत. राज्यातील काही आमदारसुद्धा माझ्यासोबत आहेत; परंतु ते सध्या बोलत नाहीत,’ असे सांगून आपल्याला एकट्याला लढाईची सवय असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. मागासवर्ग आयोग स्वतंत्रपणे काम करीत असल्याचे सांगून यावरही अधिक भाष्य करणे भुजबळांनी टाळले.

अमोल कोल्हेंवर प्रश्न, अजितदादा संतापले

Source link

ajit pawar campchhagan bhujballoksabha election 2024Maharashtra politicsshivsena shinde campछगन भुजबळलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment