म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेला बिबट्याही ‘सावज’ ठरला. रस्ता ओलांडताना एका भरधाव वाहनाने बिबट्याला दिलेल्या धडकेत शिकारीनंतर तोही गतप्राण झाला. मखमलाबाद परिसरात घटनास्थळी शवविच्छेदन केल्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची नोंद केली.
सात वर्षीय प्रौढ बिबट्या मखमलाबाद शाळेलगतच्या शेतात मृतावस्थेत आढळल्याने मंगळवारी (दि. २५) पहाटे खळबळ उडाली. वन परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपाल अनिल अहिरराव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पंचनामा केल्यावर बिबट्याने हल्ला केल्याने जवळच एक गाय मृत असल्याचेही दिसले. त्यानुसार घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानुसार गायीवर हल्ला केल्यानंतर तिला स्वत:च्या अधिवासाकडे नेण्याच्या प्रयत्नात असताना बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी नमूद केला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाल्याने वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

… अशी घडली घटना
– सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटे या दरम्यान बिबट्या सावज व पाण्याच्या शोधात मखमलाबाद शाळेजवळ आला
– तेथील एका शेतात त्याने गायीला हेरून तिच्यावर हल्ला करून ठार केले
– हे ‘सावज’ अधिवासाकडे नेत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्याला धडक दिली
– अपघातामध्ये बिबट्याच्या जबड्याला गंभीर दुखापत
– बराचवेळ व्याकूळ अवस्थेत बिबट्या निपचित पडून
– अतिरक्तस्त्राव व गंभीर दुखापतीमुळे बिबट्याचा पहाटे मृत्यू
– पशुवैद्यकीय अहवालानुसार वन विभागाने अपघाती मृत्यूची नोंद
– अहवालानुसार मृत्यूच्या किमान अर्धा तास अगोदर बिबट्याकडून गायीची शिकार