‘आयआयटी बॉम्बे’ येथे विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Indian Institute Of Technology Recruitment 2024: ‘आयआयटी – बॉम्बे’ म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, सल्लागार, प्रकल्प संशोधन सहयोगी या पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘आयआयटी’ने अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रियाची याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक – ०२ जागा
सल्लागार – ०१ जागा
प्रकल्प संशोधन सहयोगी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०४ जागा

UIIC Recruitment 2024: ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये महाभरती; जाणून घ्या पदे पात्रता आणि वेतन

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक – संबधित विषयात बी-टेक/ बीई/ एमएससी/ एमबीए/ एमसीए किंवा समकक्ष पदवी
सल्लागार – संबधित विषयात पीएचडी
प्रकल्प संशोधन सहयोगी – संबधित विषयात एम-टेक/ एमई किंवा समकक्ष पदवी
(या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक पदनिहाय खाली जोडली गेली आहे.)

वेतन –
वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक – २५ हजार २०० ते ५० हजार ४०० आणि इतर भत्ते
सल्लागार – २५ हजार (प्रती दिन)
प्रकल्प संशोधन सहयोगी – ३३ हजार ६०० ते ६७ हजार २०० आणि इतर भत्ते

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील ‘वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक’ या पदासंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील ‘सल्लागार’ या पदासंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील ‘प्रकल्प संशोधन सहयोगी’ या पदासंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

IIT Bombay Bharti 2024IIT Bombay Recruitment 2024Indian Institute Of Technology recruitment 2024recruitmentआयआयटी बॉम्बे जॉब २०२४आयआयटी बॉम्बे भरती २०२४
Comments (0)
Add Comment