नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी; पोलिस बंदोबस्त वाढवला

रायगडः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. महाड न्यायदंडधिकाऱ्यांनी राणेंना सशर्त जामीन मंजूर केला असला तरी आज ३० ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Narayan Rane Latest News)

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यात वातावरण तापले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राणेंना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार राणेंवर कारवाई करण्यात आली होती.

वाचाः ठाकरे सरकारला धक्का! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

नारायण राणे यांना कोर्टानं ३० तारखेला एनसीपीकडे हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलिस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळं परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

वाचाः ‘अटकनाट्या’वर नीलम राणे मनातलं बोलल्या; दोन्ही मुलांनाही दिला सल्ला

दरम्यान, कोर्टानं राणेंना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

वाचाः ‘ईडी’च्या नोटीसवर मंत्री अनिल परब बोलले; केला ‘हा’ महत्त्वाचा दावा

Source link

Narayan Ranenarayan rane arrestnarayan rane latest newsnarayan rane today newsनारायण राणे
Comments (0)
Add Comment