मला जेलमध्ये जावं लागलं तरी मी या गरिबांना न्याय मिळवून देऊ; उदय सामंत यांनी सांगितला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मोठा किस्सा

रत्नागिरी: अधिकाऱ्यांची देखील मानसिकता लागते केवळ मंत्री सकारात्मक असून केवळ चालत नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये मी नाही हा शब्द क्वचित वापरला असेल, असे सांगत उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील ३४७ कर्मचाऱ्यांना उद्योग विभागाच्या आस्थापनेवरील नियुक्तीपत्र देताना मोठा किस्सा सांगितला. तसेच यापूर्वी केवळ डोंगर घ्यायचे आणि जमीन म्हणून विकायचे हेच उद्योग झाले, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला आहे. माझ्या आयुष्याच्या पाप पुण्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी गरीब लोकांना न्याय देऊ शकलो ही नोंद होईल म्हणून या कार्यक्रम रत्नागिरी येथे घेण्याचे मान्य केले.

हे रखडलेलं काम नियतीच्या मनात उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यावरच होणार होतं दुसऱ्या बोर्डाच्या मीटिंग नंतर माझ्याकडे मिनिट्स जेव्हा फायनल सहीला माझ्याकडे आले त्यावेळेला मला असं सांगण्यात आले की आपण केवळ ८८ लोकांचे काम करू शकतो पण त्या दिवशी मी सही करताना सांगितलं की करायचं तर ३४७ लोकांचं सगळ्यांचं काम करायचं यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल तुम्हाला जे काय लिहायचं ते लिहा क्याग येऊन दे नाहीतर आणखी काही येऊ दे जेलमध्ये मी जाईन पण या लोकांना न्याय मिळवून देईन अशी भूमिका आपण घेतली आणि मग त्यानंतर तुषार मठकर यांच्यासारखा चांगला अधिकारी आपल्याला मिळाला आणि मग या ३४७ कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या ३४७ कामगारांना आस्थापनेवरील नियुक्तीपत्र उद्योगमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरी येथे देण्यात आली. एमआयडीसी अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल अनेक सकारात्मक निर्णयांची घोषणा त्यांनी यावेळी केली. आता जे वीज बावीस कर्मचारी उरले आहेत त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू नका तुमचे कुठेही आर्थिक नुकसान केले जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मुलं जर का परदेशी शिक्षणासाठी जाणार असतील तर त्यांच्यासाठी देखील आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्याची मोठी घोषणा यांनी रत्नागिरी येथे बोलताना केली. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यासाठी घेतलेल्या चांगले निर्णय यांची माहिती दिली.

मात्र आजवर हे सगळं का होऊ शकलं नाही असा प्रश्न उपस्थित करत यापूर्वी सगळेच फक्त जमिनी विकायच्या व्यापात होते, फक्त डोंगर घ्यायचे आणि जमीन म्हणून विकायचे हेच उद्योग यापूर्वी या खात्यात झाले अशी टीका करत विरोधकांचे नाव न घेता त्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या या कार्यक्रमाची संधी साधत सुनावले आहे.

यापूर्वी काहींनी शहापूर येथे इकोसेन्सिटिव्ह मध्ये जमीन घेण्याचे धक्कादायक धाडस केल्याचे समोर आलं त्यामुळे जमीनधारकांचे ४० लाख रुपये देण्याचे ही बाकी होते त्यावेळेला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगत विरोधकांच्या कारभारावर बोट ठेवत तेव्हापासून आपण नंतर झालेल्या बोर्डाचे मीटिंगमध्ये पर्यावरण बाधित होईल अशी कोणत्याही स्वरूपाची जमीन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली लॉईड्स कंपनी पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जमीन दिली आहे हा नक्षलवादी भाग उद्योगांचा भाग म्हणून ओळखला जाईल.

डोंबिवली येथे एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईनला जोडून टँकरद्वारे पाणी विकण्यात येत होते आपण मध्यरात्री स्वतः अडीच वाजता जाऊन हा सगळा प्रकार पाहिला होता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता पंचनामा करण्याचे आदेश दिले मात्र रात्री पाहिलेले प्रकार पहाटे चार वाजता तिथून गायब होता असाही अजूक किस्सा सामंत यांनी सांगितला. याला वरदहस्त कोणाचा होता हा उल्लेख करत त्यांनी पैसे घेण्याची प्रवृत्ती बळाऊ देऊ नका यामुळे संपूर्ण एमआयडीसी बदनाम होते आपल्याकडे असून करत नसेल हा विश्वास मला आहे पण जर का कोणाचा अनावधानाने करताना भेटलास तर त्याच्यामागे पाणी चोर ही उपाधी लागेल अशा शब्दात एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कान टोचण्यास सामंत विसरले नाहीत.

Source link

appointment in MIDCMaharashtra Industrial Development CorporationUday Samantउदय सामंतमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरती
Comments (0)
Add Comment