लोकसभेच्या रणधुमाळीसाठी अंतिम मतदार यादी कधी येणार? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला जाहीर होणार होती. त्या ऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे दुबार आणि मयतांची नावे वगळण्यासाठी आणखी मुदत मिळाल्याचे मानले जात आहे. परिणामी, मुदतीनंतरही अर्ज दाखल केलेल्या नवमतदारांना या यादीत स्थान मिळणार आहे. नावे वगळल्याने मतदारयादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव राजेश कुमार सिंग यांनी काल उशिरा परिपत्रक जारी केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७ ऑक्टोबरला राज्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांना नोंदणी तसेच मयत व दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी नऊ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जांवर २६ डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, हरियाणा, झारखंड, केरळ, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली अशा १२ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची दिलेली मुदत ही आता बदलली आहे.

मयत तसेच दुबार नावे वगळण्यात येणार असल्याने मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नवमतदारांनाही नोंदणीची पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.

– श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

सारथी, बार्टी, महोज्योतीची वादग्रस्त परीक्षा रद्द, पुन्हा कधी घेतली जाणार परीक्षा? जाणून घ्या
आतापर्यंत आलेले अर्ज निकाली काढण्यासाठी २६ डिसेंबरची दिलेली मुदत बदलून १२ जानेवारीपर्यंत दिली आहे. आयोगाने आतापर्यंत पुढील वर्षी पाच जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे निश्चित केले होते. आता मात्र नव्या आदेशानुसार, २२ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
पुणे सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं, विमाननगरमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नऊ ते २६ डिसेंबर या दरम्यान नव मतदार नोंदणी, दुबार नावे तसेच त्यातील कार्डातील दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामासाठी आता १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान दुबार नावे तसेच मयतांची नावे वगळण्याच्या कामास प्राधान्य देण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याशिवाय नवमतदारांना नोंदणीसाठी नव्याने संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिणामी अंतिम मतदार यादीत नव्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.’
मीडियापुढे मौन, कार्यकर्त्यांना म्हणाले, कोर्टात जायची तयार ठेवा, चंद्रकांत पाटलांनी अजित दादांविरोधात मोर्चा उघडला
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

election commissionlok sabha electionLok Sabha Election Voter Listकेंद्रीय निवडणूक आयोगराज्य निवडणूक आयोगलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक बातम्यालोकसभा निवडणूक मतदार यादीश्रीकांत देशपांडे
Comments (0)
Add Comment