जळगावातील ‘त्या’ कॅफेवर भाजप आमदार पोलिसांना घेऊन धडकले, तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळले, अन्…

जळगाव : अश्लील चाळ्यांसाठी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेची भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना सोबत घेत केलेल्या छापेमारीत प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट कॅफेची सहकाऱ्यांसोबत तोडफोड केली. कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलिसांनी केलेल्या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकासह – आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अंधारात काही तरुण-तरुणी आढळून आल्याचं दिसून आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची स्वतःच तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे.

Maratha Reservation: मागासलेपणाचे निकष ठरले, सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचं एक पाऊल पुढे; सर्वेक्षण निकषांनुसार
चाळीसगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कॅफेबाबत मागील वर्षी देखील आपण कॅफे चालकाला समज दिली होती. त्यानंतर काही काळासाठी या ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार बंद देखील झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कॅफेमध्ये पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याचे माहीत सामोर आल्याने न.पा प्रशासन,पोलीस प्रशासन आणि आपण या ठिकाणी आलो असता या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण-तरुणी आढळून आले आहेत, असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अशा प्रकारची गैरकृत्य कोणी करत असेल आणि त्याला कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर ते कदापिही खपवून घेतलं जाणार नाही. वेळ पडली तर अशा इमारतीवर बुलडोझर देखील फिरवला जाईल, असा इशारा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील मंगेश चव्हाण यांनी दिली.

रामभूमीतून भाजपच्या प्रचाराचा नारळ! १२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर

Source link

chalisgaon mangesh chavan cafe raidJalgaon policeMLA mangesh chavanmla mangesh chavan cafe raidआमदार मंगेश चव्हाणआमदार मंगेश चव्हाण कॅफे रेडचाळीसगाव मंगेश चव्हाण कॅफे रेडजळगाव पोलीस
Comments (0)
Add Comment